FD News
FD News

FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी ग्राहकांकडे वेगवेगळे पर्याय आहेत. मात्र असे असले तरी अजूनही एफडी मध्ये गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. अनेकजण FD अर्थातच फिक्स डिपॉझिट करण्याला विशेष पसंती दाखवतात. विशेष म्हणजे अलीकडे बँका देखील एफडी करणाऱ्यांना चांगले व्याज देत आहे. दरम्यान देशभरातील प्रमुख बँकांच्या एफडीच्या व्याज दरात वाढ होणार की कपात होणार याबाबतचा निर्णय आता येत्या तीन दिवसांनी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 5 एप्रिल 2024 ला आरबीआयची महत्वाची बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत आरबीआय रेपो रेट वाढवायचे की नाही याबाबतचा निर्णय घेणार आहे.या बैठकीत एक तर आरबीआय रेपो रेट वाढवेल किंवा रेपो रेट कमी करणार आहे. रेपो रेट वाढले तर एफडीचे व्याजदर वाढण्याची शक्यता असते.

दुसरीकडे जर रेपो रेट कमी झाले तर एफडीचे व्याजदर देखील कमी होण्याची शक्यता असते. यामुळे आता आरबीआयच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, आज आपण देशातील अशा चार बँकाची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की आपल्या ग्राहकांना एफडी साठी 9% पर्यंतचे व्याज देत आहेत.

एफडीवर सर्वोत्कृष्ट व्याज देणाऱ्या बँका

शिवालिक स्मॉल फायनान्स बँक : ही देशातील एक प्रमुख स्मॉल फायनान्स बँक असून या बँकेने गेल्या महिन्यात आपल्या एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना FD वर 3.50% ते 8.70% पर्यंत व्याज ऑफर करत आहे. पण ज्येष्ठ नागरिकांना ही बँक 0.50 टक्के अधिकचे व्याज देत आहे.

यानुसार जेष्ठ नागरिकांनी जर या बँकेत एफडी केली तर त्यांना 4% ते 9.20% दरम्यान व्याज मिळणार आहे. बँकेकडून 24 महिने 1 दिवस ते 36 महिने कालावधीच्या FD साठी सर्वाधिक व्याज दिले जात आहे. या एफडीवर बँकेकडून सामान्य ग्राहकांना 8.70 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.20% एवढे व्याज दिले जात आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : या बँकेने गेल्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपल्या एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली. यानुसार ही बँक सामान्य ग्राहकांना एफडी साठी ४% ते ९.०१% पर्यंतचे व्याज ऑफर करत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना ही बँक FD वर 4.40% ते 9.25% दरम्यानचे व्याज ऑफर करत आहे. 25 महिने कालावधीच्या FD साठी ही बँक सामान्य ग्राहकांना 9.01% आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.25% एवढे कमाल व्याजदर देत आहे.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक : ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याज ऑफर करत आहे. या बँकेच्या माध्यमातून 555 ते 1111 दिवसांच्या कालावधीच्या एफडीवर नियमित ग्राहकांना 8.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.25% एवढे व्याज दिले जात आहे.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक : ही बँक सामान्य ग्राहकांना FD साठी 3.75% ते 8.50% पर्यंत व्याज देत आहे. बँक 15 महिन्यांच्या FD साठी सामान्य ग्राहकांना 8.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 9% एवढे व्याज ऑफर करत आहे. हे दर गेल्या महिन्यापासून लागू झालेले आहेत.