HDFC Bank News : एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज ऑफर करते. पर्सनल लोन देखील देशातील अनेक बँकांच्या तुलनेत या बँकेकडून कमी व्याजदरात ऑफर केले जात आहे.
एचडीएफसी ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेच्या यादीत येते. आरबीआयने मागे एक अहवाल जारी केला होता यामध्ये देशातील 3 बँका सर्वाधिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट सांगितले गेले होते.
या तीन बँकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक या दोन खाजगी बँकांचा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेचा समावेश होता. अर्थातच एचडीएफसी बँक ही पूर्णपणे सुरक्षित आहे, या बँकेत गुंतवलेला पैसा कधीच बुडू शकत नाही.
दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेच्या पर्सनल लोन संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. एचडीएफसी बँक पर्सनल लोन साठी किती व्याज आकारते.
तसेच बँकेकडून जर पाच वर्षाचा कालावधीसाठी 15 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर किती रुपयाचा हप्ता भरावा लागणार ? या संदर्भात आता आपण अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
HDFC बँक पर्सनल लोनसाठी किती व्याजदर आकारते ?
HDFC Bank ही वैयक्तिक कर्जासाठी सर्वात कमी व्याज आकारणारी बँक असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अर्थातच इतर बँकांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जासाठी चे या बँकेचे व्याजदर हे कमी आहेत. यामुळे जर वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणे ग्राहकांना फायदेशीर ठरू शकते.
या बँकेकडून किमान 10.50% या व्याज दरात वैयक्तिक कर्ज ऑफर केले जात आहे. मात्र हा किमान व्याजदर आहे. ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच या व्याज दरात कर्ज मिळणार आहे.
किमान व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी किती सिबिल स्कोर असावा
ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा लोकांनाच 10.50% या किमान व्याजदराचा फायदा होईल. ज्यांचा सिबिल यापेक्षा कमी असेल त्यांना 10.50% पेक्षा अधिकचे व्याजदर लागणार आहे.
प्रोसेसिंग फी किती लागते
एचडीएफसी बँकेकडून जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला यासाठी प्रोसेसिंग फी देखील द्यावी लागणार आहे. बँकेकडून 4 हजार 999 पर्यंतचे प्रोसेसिंग चार्जेस वसूल केले जात आहेत.
5 वर्षासाठी 15 लाखाचे पर्सनल लोन घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ?
एचडीएफसी बँकेकडून 15 लाखाचे वैयक्तिक कर्ज पाच वर्षाच्या कालावधीसाठी घेतले तर 32 हजार 241 रुपये एवढा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.