तुम्ही खुर्चीवर कसे बसता या वरून तुमच्या व्यक्तिमत्वाच्या खास गोष्टी उघड होत असतात.तुम्ही कसे व्यक्ती आहात ते तुमच्या खुर्चीवर बसण्याच्या पद्धतीवरून कळते.आपण आपल्या दैनंदिन जीवनात रोज अश्या लोकांना भेटत असतो ज्यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते.त्यामुळे ते गर्दीतही उठून दिसतात.आपण आपल्या जीवनात रोज लोकांशी भेटत असतो,बोलत असतो त्या प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगवेगळे असते.
आपल्याला भेटलेल्या लोकांपैकी आपल्याला काहींचे बोलणे आवडते तर काहींचे चालणे आवडते तर काहींच्या बसण्याची पद्धत सुद्धा आवडते.खरं तर या सगळ्या सवयी दुसऱ्यांना आपले व्यक्तिमत्त्व दर्शवत असतात.
जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखायचे असेल तर आपण त्याच्या बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष दिले पाहिजे. हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटलं असेल पण हे अगदी खरं आहे.खुर्चीवर बसण्याच्या पद्धतीवरून व्यक्ती बद्दल खूप काही गोष्टी समजून येत असतात.चला मग जाणून घेऊ कि एखाद्या व्यक्तीच्या खुर्चीवर बसण्याच्या पद्धतीवरून त्याचा स्वभाव कसा ओळखायचा ?
पायावर पाय ठेवून बसणे : जर एखाद्याला पायावर पाय ठेवून बसण्याची सवय असेल तर असे लोकं खुप लाजाळू स्वभावाचे असतात.असे लोक वाद विवादापासून लांब राहणे पसंद करतात आणि त्यांच्याच धुंदीत जगणे पसंत करतात.
गुडघ्यापासून टाचेपर्यंत पाय सरळ ठेवून बसणे : जर तुम्ही खुर्चीवर बसताना तुमचे पाय गुडघ्यापासून ते टाचेपर्यंत सरळ ठेवून बसत असाल तर असे लोकं आत्मविश्वासाने भरलेले असतात.तुमच्याकडे बघून असे दिसते कि तुम्ही खूप शिस्तबद्ध व्यक्ती आहात आणि तुमच्या आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही यश मिळवता.
गुडघे जवळ करून बसणे : जर तुम्ही खुर्चीवर बसताना गुडघे जवळ करून बसत असाल आणि पायांच्या पंजात अंतर ठेवून बसत असाल तर तुम्ही बेजबाबदार व्यक्ती आहात.पण तुम्ही एक आकर्षक व्यक्ती सुद्धा आहात.
पायांना वरच्या बाजूने उचलून बसणे : जर तुम्ही पाय वरच्या बाजूने उचलून आणि मागच्या बाजूने पायांच्या टाचा जवळ करून बसत असाल तर तुमच्यात एकाग्रतेची कमी असते आणि तुम्ही मेहनतीचे काम टाळणाऱ्या स्वभावाचे असतात.
पाय एकदम चिकटून बसणारे : जर तुम्ही खुर्चीवर बसताना पाय एकदम जवळ चिकटून बसत असाल आणि खुर्ची थोडीशी वाकडी करून तुमचं काम करत बसत असाल तर तुम्ही हट्टी स्वभावाचे असतात आणि जे करायच ठरवलं आहे ते करूनच दाखवता,असा तुमचा स्वभाव असतो.
सूचना : ( वरती दिलेली माहिती सामान्य ज्ञानाच्या आधारे लिहिलेली आहे.हि गोष्ट खरी असण्याची ग्वाही आम्ही देत नाही )