भेंडा.अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील केतन पांडुरंग काळे पाटील यांची अहमदनगर (अहिल्यानगर) राष्ट्रवादी युवक कांग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

नुकतेच याबाबत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते अहमदनगर येथे 17 ऑगस्ट शनिवारी नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

या नियुक्ती नंतर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटिल, कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया ताई सुळे, लोकप्रिय खासदार निलेश लंके,

युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, राजेंद्र फाळके जिल्हाअध्यक्ष रामेश्वरजी निमसे, दादाभाऊ कळमकर यांनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल नेवासा फाटा, शनिशिंगणापूर, अहमदनगर येथे या निवडीचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.

या निवडीबद्दल केतन काळे यांनी सांगितले की मी अहमदनगर जिल्ह्यात युवकांचे मोठं संघटन करुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.

त्याचबरोबर युवकांची चांगली फळी उभी करू नवीन तरुणांना पक्षात काम करण्याची संधी देऊ. युवा वर्गाच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहु. शेतकरी, युवक, महिला उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे यांनी सांगितले