Maharashtra Famous Picnic Spot
Maharashtra Famous Picnic Spot

Maharashtra Famous Picnic Spot : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत, विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी बाहेर निघत आहेत. उन्हाळी हंगामात फिरण्याची मजा खरंच काही औरच असते. उन्हाळ्यात रखरखत्या उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी अनेकजण थंड हवेच्या ठिकाणाला भेटी देतात. जर तुम्हीही अशाच काहीसा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.

खरेतर अनेक जण पर्यटनासाठी महाराष्ट्रबाहेर जातात, तर काही जण भारताबाहेर जातात. रुटीन नऊ ते पाच असे काम, शहरातील तो गजबजाट, धकाधकीचे जीवन आणि उन्हाळ्यातली ती असह्य अशी उष्णता या साऱ्या पार्श्वभूमीवर अनेकजण पिकनिकचा प्लॅन बनवतात. कोणी महाराष्ट्राबाहेर जातं, तर कोणी भारताबाहेर जातं.

मात्र आज आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातल्या अशा काही प्रसिद्ध पिकनिक स्पॉटची माहिती सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमच्या उन्हाळी सुट्ट्या आनंदात घालू शकणार आहात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया राज्यातील काही प्रसिद्ध पिकनिक स्पॉट विषयी.

आंबोली : हे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशनं आहे. हे पश्चिम घाटाच्या मधोमध वसलेले ठिकाण पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते. हे सुंदर असा हिल स्टेशनं राज्यातील कोकण विभागातील दक्षिण भागात वसलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे छोटेसे हिल स्टेशन नैसर्गिक सौंदर्य स्वर्गीय धबधबे आणि हिरवेगार लँडस्केप यासाठी पर्यटकांमध्ये नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

खरेतर येथे नेहमीच तुम्हाला पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळणार आहे. पण उन्हाळ्यात या ठिकाणाला येणाऱ्यांची संख्या वाढते. उन्हाळ्यात पिकनिक साठी हे एक बेस्ट समर पिकनिक डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. यामुळे जर तुम्हीही यंदाच्या उन्हाळ्यात कुठे पिकनिकसाठी जाणार असाल तर आंबोली हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकते.

मालवण : कोकणातील नैसर्गिक सौंदर्यता संपूर्ण जगात कुठेच शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे दरवर्षी कोकण फिरण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी जगभरातील पर्यटक आपल्या सुंदर त्या कोकणात हजेरी लावतात. दरम्यान जर तुम्ही ही कोकण सहल काढण्याच्या तयारीत असाल तर मालवण हे ठिकाण देखील तुमच्या सहलीत नक्की ऍड करा. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वसलेले मालवण हे तुम्हाला गोव्याची फिलिंग देणार आहे. हे ठिकाण कोकणच्या मध्यभागी वसलेले आहे.

मालवण हे समुद्रकिनारी असलेले एक आकर्षक शहर आहे, जे गोव्यासारखे वातावरण, मूळ समुद्रकिनारे, स्वच्छ निळे पाणी, साहसी खेळ, भव्य सागरी किल्ले आणि उत्कृष्ट किनारपट्टी खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते. त्यामुळे जर तुम्हीही कोकणात गेलात किंवा यंदाच्या उन्हाळ्यात कोकणात ट्रिप काढत असाल तर मालवणला नक्कीच भेट द्या.

पवना लेक : तुम्हीही धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा ब्रेक घेऊ इच्छित असाल तर महाराष्ट्रातील पवना तलावला एकदा नक्की भेट द्या. हा एक सुंदर कृत्रिम जलाशय आहे, ज्याला पवना धरणाचे नाव देण्यात आले आहे. हे लोणावळा आणि खंडाळा या सुंदर हिल स्टेशनमध्ये स्थित आहे. तुम्ही येथे तुमच्या पार्टनर सोबत किंवा परिवारासमवेत क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता.