Small Business Idea
Small Business Idea

Small Business Idea : चांगले जीवन जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. चांगली लाइफस्टाइल हवी असेल तर पैसे लागतात. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा असून या पूर्ण करण्यासाठी पैशांची निकड भासत असते. अलीकडे तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे आता आधीच्या तुलनेत अधिक पैशांची गरज भासत आहे. दरम्यान अनेकांची पैशांची गरज ही नोकरी मधून पूर्ण होत नाहीये.

यामुळे अनेकजण स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न पाहत आहेत. अनेकांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू देखील केला आहे. तर काहीजण नजीकच्या भविष्यात स्वतःचा बिझनेस सुरू करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही नवीन बिजनेस सुरू करणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक नवीन बिजनेस आयडिया घेऊन आलो आहोत.

आज आपण केटरिंग बिझनेस विषयी माहिती पाहणार आहोत. हा एक असा बिजनेस आहे जो की अवघ्या काही हजाराच्या गुंतवणुकीत सुरू केला जाऊ शकतो आणि यातून प्रत्येक महिन्याला 25 ते 30 हजार रुपयांची कमाई सहजतेने होऊ शकते.

केटरिंग बिझनेससाठी किती गुंतवणूक लागते

हा व्यवसाय तुम्ही अवघ्या दहा हजाराच्या गुंतवणुकीत सुरू करू शकता. हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला फारसा पैसा लागत नाही. खरे तर अलीकडे कोणताही छोटा मोठा फंक्शन असला तरी देखील स्वयंपाकासाठी केटरिंगकडे सर्विस दिली जाते.

बर्थडे पार्टी, एनिवर्सरी पार्टी, बेबी शोवर, रिसेप्शन, लग्न, हळद, रिटायरमेंट, वास्तुशांती पूजा, सत्यनारायण पूजा अशा विविध फंक्शन साठी केटरिंगची गरज असते. यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर निश्चितच तुम्हाला चांगली कमाई होणार आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी लेबरची गरज भासणार

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला भांडवल लागत नाही मात्र लेबर आवश्यक असते. या व्यवसायासाठी तुम्हाला स्वयंपाकासाठी लागणारी सर्व प्रकारचे किचन अप्लायन्सेस खरेदी करावी लागणार आहेत. सुरुवातीला तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या सामानाचा उपयोग करून हा बिजनेस चालू करू शकता.

जेव्हा तुमचा बिजनेस मोठा होईल तेव्हा तुम्ही अतिरिक्त सामान खरेदी करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला गॅस सिलेंडर, स्वयंपाकाचे भांडे, शेगडी असे विविध सामान लागणार आहे. तसेच केटरिंगची ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला किराणा करावा लागणार आहे.

याशिवाय जर तुम्हाला स्वतः स्वयंपाक बनवता येत असेल तर ठीक नाहीतर तुम्हाला आचारी देखील लावावा लागणार आहे. वेगवेगळ्या भाज्या बनवण्यासाठी तुम्हाला एक किंवा एकापेक्षा अधिक आचारी लावावे लागू शकतात.

कमाई किती होणार

केटरिंगचा बिजनेस सुरू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची योग्य पद्धतीने मार्केटिंग करावी लागणार आहे. मार्केटिंगसाठी तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू शकता. अलीकडे इंस्टाग्राम हे प्लॅटफॉर्म मार्केटिंग साठी खूपच उत्तम ठरत आहे. यामुळे तुम्हीही तुमच्या व्यवसायाची इंस्टाग्रामवर मार्केटिंग करू शकता.

यासाठी तुम्ही सोशल सोशल मीडिया इनफ्लून्सरची मदत घेऊ शकता. याशिवाय ऑफलाइन मार्केटिंगसाठी पॅम्प्लेटचा वापर करू शकता. मार्केटिंगसाठी तुम्ही तुमच्या मित्र परिवाराचा तसेच नातेवाईकांची देखील मदत घेऊ शकता. जर तुम्ही योग्य मार्केटिंग केली तर या व्यवसायातून महिन्याला 25 ते 30 हजाराची कमाई सहजतेने होऊ शकते.