India News (इंडिया न्यूज), Black Moon : आज 30 डिसेंबर 2024 च्या रात्री एक दुर्मिळ खगोलीय घटना होणार आहे,ज्याला “ब्लॅक मून” चे आगमन असे म्हणतात.ही घटना महिन्यातील नवीन चंद्र म्हणून घडणार आहे,हि घटना दर दोन ते तीन वर्षांनी घडत असते.यूएस नेव्हल ऑब्झर्व्हेटरी यांनी सांगितल्यानुसार, सोमवारी संध्याकाळी 5:27 वाजता या नवीन चंद्राचा सर्वोच्च बिंदू दिसणार आहे.
काळा चंद्र: ही खगोलीय दुर्मिळ घटना नेमकि आहे तरी काय ?
ज्यावेळेस चंद्र प्रकाशाचा काही भाग पृथ्वीवर न पोहोचता तो आकाशात सूर्यामध्ये पूर्णपणे विलीन होऊन जातो तेव्हा त्यावेळी ब्लॅक मून तयार होतो.यामुळे चंद्र पृथ्वीवरून अदृश्य होऊन जातो.
कारण नवीन चंद्र सूर्याच्या एका सरळ रेषेत आलेला असतो ज्यामुळे चंद्राचा उजेडाचा भाग सूर्याकडे वळतो आणि त्यामुळे चंद्र पृथ्वीवरून दिसत नाही.चंद्र आणि सूर्याचे हे संरेखन त्या दिवशी सूर्योस्ताच्या वेळी घडते, ज्यामुळे सूर्याचा उजेडामुळे आपल्याला चंद्र दिसत नाही.
काळा चंद्र उघड्या डोळ्यांनी दिसत येत नाही,पण त्यामुळे आकाशातील तारे एकदम स्पष्ट दिसू लागतात.चंद्रप्रकाश नसल्यामुळे तारे अधिक स्पष्टपणे चमकतात,ज्यामुळे खगोलीय पिंडांचे निरीक्षण करणाऱ्या लोकांना सुंदर दृश्य बघायला मिळते.
काळ्या चंद्राचे नेमके काय परिणाम होतात
1.भरती-ओहोटीवर परिणाम
जेव्हा चंद्र आणि सूर्य सरळ रेषेत येतात,तेव्हा दोघांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा पृथ्वीच्या महासागरांवर जास्त परिणाम होतो,म्हणून समुद्रात प्रचंड भरती येते. यावेळी,महासागरांमध्ये भरतीची पातळी खूप जास्त वाढू शकते,ज्याला “सुपर टाइड्स” म्हणतात.
2. उल्का वर्षावांवर परिणाम
चंद्राच्या प्रकाशामुळे बऱ्याचदा उल्कावर्षाव दिसत नाही,कारण त्याच्या तेजस्वी प्रकाशामुळे आकाशातील बाकीच्या घटना दिसत नाहीत.अमावस्या असल्यामुळे या समस्या दूर होतात,ज्यामुळे उल्कावर्षाव आणखी स्पष्ट दिसून येतो.अश्यावेळी चंद्र प्रकाश नसल्यामुळे आपण सहज आकाशीय पिंड पाहू शकतो.
जाणून घ्या ब्लॅक मून आणि ब्लू मूनमधील फरक
ब्लॅक मून आणि ब्लू मून या दोन्हीमध्ये मध्ये फरक असतो.जेव्हा एका महिन्यात दोन पौर्णिमा असतात (ज्या उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे पाहता येतात) तेव्हा त्याला ब्लू मून म्हणतात,तर काळा चंद्र पूर्णपणे भिन्न असतो.ब्लॅक मूनची घटना सूर्य आणि चंद्राच्या संरेखनामुळे निर्माण होत असते ज्यामुळे चंद्र दिसेनासा होतो.
हे आहे काळ्या चंद्राचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व
पौराणिक कथांमध्ये ब्लॅक मूनला महत्त्वाचे स्थान आहे.द ओल्ड फार्मर्स पंचांगानुसार, चार नवीन चंद्र असलेल्या सीझनमधील तिसरी अमावस्या असेल तेव्हा काळा चंद्र दिसू शकतो.जेव्हा नवीन चंद्र नसलेला महिना असतो तेव्हा ही अत्यंत दुर्मिळ परिस्थिती पहायला मिळते.ही घटना अंदाजे दर 19 वर्षांनी एकदा येते आणि पुढच्या वेळी अशी घटना थेट 2033 मध्ये दिसेल.
काळा चंद्र कसा बघायचा ?
ब्लॅक मून नंतर चंद्राच्या वाढीची प्रक्रिया चालू होत असते. 30 डिसेंबर नंतर, सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात चंद्र पश्चिमेला पातळ चंद्रकोराच्या रूपात दिसतो. ब्लॅक मून पाहणे सहज शक्य नसले तरी त्यानंतर आकाशात मोठा झालेला चंद्र दिसणे हा एक वेगळाच अनुभव असणार आहे.
भविष्यातील काळा चंद्र
भविष्यात काळा चंद्र ऑगस्ट 2025 मध्ये दिसणार आहे,चार हंगामामधील हा तिसरा नवीन चंद्र असणार आहे.खगोलशास्त्र प्रेमींसाठी हा क्षण एक पर्वणी ठरणार आहे.
30 डिसेंबर 2024 च्या रात्री दिसणारा काळा चंद्र ही फक्त एक दुर्मिळ खगोलीय घटना नसून चंद्र आणि सूर्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी हि एक महत्त्वाची घटना असणार आहे.या दिवशी चंद्र दिसणार नाही,पण त्याच्यामुळे दिसणाऱ्या परिणामांमुळे,(वाढत्या भरती-ओहोटी,उल्कावर्षावांचे चांगले दृश्य आणि ताऱ्यांची वाढलेली चमक,)हि घटना अजूनच लक्षणीय असणार आहे.