Mulank 5
Mulank 5

Mulank 5 : भारतात वैदिक ज्योतिषशास्त्राला मानणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिष शास्त्राचा एक भाग आहे.

अंकशास्त्रानुसार, व्यक्तीची जन्मतारीख ही व्यक्तीच्या संपूर्ण स्वभावाची माहिती देत असते. जन्मतारीखवरून त्या व्यक्तीचे करिअर, शिक्षण, पैसा, लग्न इत्यादीची माहिती समजू शकते.

दरम्यान आज आपण अशा एका जन्म तारखेला जन्मलेल्या लोकांची माहिती पाहणार आहोत जे की नेहमीच अरेंज ऐवजी लव मॅरेज करण्याला प्राधान्य देतात.

असे म्हणतात की या जन्म तारखेला जन्मास आलेला मुलगा किंवा मुलगी नेहमीच लव मॅरेज करण्याला महत्व दाखवतात.

निश्चितच आता तुम्हाला नेमक्या कोणत्या तारखेला जन्मलेले लोक लव मॅरेज करण्याला प्राधान्य देतात हे जाणून घ्यायचे असेल, चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

कोणत्या तारखेला जन्मलेले लोक Love Marriage करतात?
अनेकांना मनासारखा जोडीदार हवा असतो यामुळे ते लव मॅरेज करण्याचा निर्णय घेतात. त्यांचे ज्या व्यक्तीवर प्रेम असते त्याच व्यक्ती सोबत त्यांना लग्न करायचे असते.

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक हे नेहमीच लव्ह मॅरेज करण्याच्या प्रयत्नात असतात. म्हणजे ज्या लोकांचा मूळांक पाच असतो असे व्यक्ती नेहमीचं लव मॅरेज करण्याला प्राधान्य दाखवतात.

पण मुलांक पाच असलेल्या लोकांना कुटुंबाची मर्जी देखील राखायची असते. त्यामुळे या लोकांना लव मॅरेज जरी करायचे असेल तरी देखील ते घरच्यांच्या सहमतीनेच लव मॅरेज करण्यास प्राधान्य दाखवतात.

विशेष म्हणजे घरच्यांना ते या संदर्भात राजी देखील करत असतात. या अशा लोकांच्या कुंडलित लव मॅरेज होण्याची शक्यता अधिक असल्याचे ज्योतिष शास्त्रात नमूद करण्यात आले आहे.

याचा अर्थ सर्वच लोक लव मॅरेज करतील असे नाही मात्र ज्या लोकांचा मूळांक 5 असतो त्यातील बहुतांशी लोकल लव मॅरेज करतात. खरेतर लोकांचे विवाह हे ग्रह योगाच्या आधारावरच होतात. विवाहाचे योग बनणे हे ग्रहांवर आधारित असते.