एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत ३६ रस्ते व जागांवर ‘पे अॅण्ड पार्क’ मंजूर करण्यात आले आहे.यासाठी महानगर पालिकेने नाशिक येथील दिग्विजय एंटरप्रायजेस या खासगी संस्थेची नियुक्ती केली.लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे,अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात आयुक्तांनी म्हटले आहे की, महानगरपालिका प्रशासनाने पार्किंग मोबेलिटी प्रा. लि. या खाजगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करून नो पाकिंग झोन, नो हॉकर्स झोन, सम विषम सशुल्क पार्किंग, एकेरी वाहतूक, महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे अँड पार्क आदींच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल तयार केला होता.
यात १८ प्रमुख रस्त्यांवर नो पार्किंग व नो हॉकर्स झोन करण्यात आले आहेत.तर कापड बाजार व नवीपेठ रस्त्यावर एकेरी वाहतूक प्रस्तावित करण्यात आली आहे.खासगी संस्थेने तयार केलेल्या प्रकल्प अहवालाला महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढून खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहर वाहतूक शाखेलाही सम विषम पार्किंग, नो पार्किंग झोनच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात येणार आहे.शहरात लक्ष्मी भाऊराव पाटील विद्यालय, बेलदार गल्ली, चांद सुलताना विद्यालय समोरील रस्ता, गाडगीळ पटांगण, गांधी मैदान, मंगल गेट मटन मार्केट समोरील जागा, नेहरू मार्केट मोकळी जागा
वस्तू संग्रहालय, नोबल हॉस्पिटल लगतचा रस्ता, जुने सिव्हील हॉस्पिटल, लाल टाकीरस्ता अप्पू हत्ती चौक ते स्वास्थ्य हॉस्पिटल ते झेडपी लगत, पोलिस लाईन लगत, बालिकाश्रम रस्ता नीलक्रांती चौक ते नायरा पेट्रोल पंप, सातभाई मळा, सावेडी जॉगिंग ट्रॅक १, सावेडी जॉगिंग ट्रॅक २, मिसगर विद्यालयमागे, वाडिया पार्क मधील दक्षिणेकडील गेट जवळील जागा, एकविरा चौक ते पारिजात चौक रस्ता, इमारत कंपनी
अमरधाम पश्चिमेकडील कम्पौंड जवळील जागा, मानकर गल्ली, नीलक्रांती चौक ते चौपाटी कारंजा रस्ता, पांजरपोळ मोकळी जागा (मार्केटयार्ड चौक), पाईपलाईन रस्ता, पुणे बस स्थानकाजवळ, नेताजी सुभाषचंद्र चौक ते नवी पेठ शहर सहकारी बँकपर्यंत, कोठी रस्ता ते यश पलेस हॉटेल, भिस्तबाग चौक ते टीव्ही सेंटर हडको चौकापर्यंत, प्रोफेसर चौक ते प्रेमदान हॉटेल चौक, नवीन कलेक्टर ऑफिस रोड, सेंट आण्णा चर्च रोड, बंगाल चौकी, चायना मार्केट
सहकार सभागृह रोड, सावित्रीबाई फुले संकुल (आकाशवाणी केंद्राशेजारी) या ३६ ठिकाणी पे अँड पार्क करण्यात येणार आहे.भिस्तबाग चौक, एकविरा चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, दिल्लीगेट चौक, चौपाटी कारंजा चौक, नेताजी सुभाषचंद्र चौक, तेलीखुंट लोकसेवा चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय चौक, न्यू आर्टस कॉलेज परिसर, भिंगारवाला चौक, जुने कोर्ट ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंतचा रस्ता, झोपडी कॅन्टीन ते मिस्कीन मळा गंगा उद्यानपर्यंतचा रस्ता
पुणे बसस्थानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, विशाल गणपती मंदिर माळीवाडा चौक, मार्केटयार्ड चौक, तख्ती दरवाजा मशीद ते शनिचौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग नाही, मार्केट यार्ड चौक ते सक्कर चौक रस्ता १८ ठिकाणी २५ मीटर क्षेत्रात नो पार्किंग व नो हॉकर्स झोन करण्यात आले आहे.
संत दास गणुमहाराज पथ (कोर्ट गल्ली), पटवर्धन चौक ते शांतीबेन अपार्टमेंट (कोर्टाच्या इमारतीसमोर), घुमरेगल्लीतील तख्ती दरवाजा मस्जिद, संगम प्रिंटिंग प्रेस ते अमृत किराणा स्टोअर्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर माळीवाडा वेस ते डॉ. आंबेडकर पुतळा, माळीवाडा वेस ते पंचपिर चावडी, पिंजारगल्ली, आडते बाजार अनिल कुमार पोखर्णा (नारळवाले) पिंजारगल्ली कॉर्नर ते गदिया शॉप, शरद खतांचे दुकान
आडते बाजार कॉर्नर ते कोंड्या मामा चौक, आयुर्वेद कॉलेज कॉर्नर ते माळीवाडा, रामचंद्र खुट रस्ता ते ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय रस्त्यावर, श्री महाप्रभुजीमार्ग जुना कापडबाजार, संपूर्ण चितळे रस्ता चौपाटी कारंजापर्यंत, दिल्ली गेट ते चौपाटी कारंजा, दाळ मंडई ते कापड बाजार रस्ता या ठिकाणी सशुल्क सम आणि विषम (पी १ पार्किंग क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
पार्कीगसाठी आकारण्यात येणारे प्रतीतास शुल्क पी २) निश्चित करण्यात आले आहे. ५ रुपये, चारचाकी १० रुपये, त्यानुसार दुचाकी टेम्पो २५ रुपये, मिनी बस ५० रुपये, अवजड वाहने (ट्रक, बस, टुरिस्ट बस) १२० रुपये, खासगी बस (१५ मीटर लांब) १५० रुपये, पॅरा ट्रान्झिट नॉन डेझिग्नेटेड एरिया १० रुपये असे शुल्क आकारण्यात येणार आहे.
नो पार्किंग, नो हॉकर्स झोनमध्ये पार्कोंग केल्यास दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. दुचाकी (टोविंग) रुपये दुचाकी (वलंपिंग) ७४२ ५०० रुपये, चारचाकी (टोविंग) ९८४ रुपये, चारचाकी (क्लपिंग) ७४२ रुपये आकारण्यात येणार आहेत.