नगर शहरात दररोज १२० टन कचरा संकलन केले जाते.शहरातील उपनगरांमध्ये अनेक भागात घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी नागरिक करतात.या तक्रारीचे निवारण करण्यासाठी व कचरा संकलनात सुसूत्रता आणण्यासाठी महापालिकेकडून स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येक घराला क्यूआर कोड अडकविण्यात आला आहे.क्यूआर कोड एक प्रकारची तक्रार पेटीच आहे.
अहिल्यानगर महापालिकेकडून दररोज शहरातील कचरा संकलन केले जाते.शहरात १७ प्रभागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात घंटागाड्या फिरतात. त्या माध्यमातून सुमारे १२० टन कचरा गोळा केला जातो.त्यासाठी ६५ घंटागाड्या व साडेतीनशे कर्मचारी काम करतात.शहरात जवळपास दीडशे टन कचरा दररोज निघतो,असे बोलले जाते.मात्र,त्यापैकी फक्त १२० टन कचऱ्याचे संकलन होते.
बाकी कचरा जागोजागी पडून राहतो,अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.बोल्हेगाव, सावेडी, केडगाव अशा अनेक भागांमध्ये घंटागाड्या जात नसल्याच्या ही तक्रारी आहे.या कचरा संकलनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहरातील प्रत्येक घराला क्यूआर कोड अडकविण्यात आला आहे.
घंटागाडी गेल्यानंतर कर्मचारी अप वर त्या क्यूआर कोड घेतील.त्यामुळे घंटागाडी कोणत्या भागात गेली होती,कोणत्या कॉलनीमध्ये गेली होती,कोणाच्या घरासमोर उभी होती, कुठून कचरा संकलन केले.या सगळ्या बाबी महापालिका अधिकाऱ्यांना समजणार आहेत. एखाद्या भागामध्ये घंटागाडी चार दिवस जर गेली नाही तरीसुद्धा महापालिका अधिकाऱ्यांना अॅपवर समजणार आहे.
सध्या शहरातील सर्व घरांना क्यूआर कोड अडकविण्याचे काम सुरू आहे.या कामास आणखी दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता आहे.त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल,असे महापालिकेतील सूत्रांकडून समजले.शहरातील विविध भागात घंटागाडी येत नसल्याच्या नागरिकांच्या सतत तक्रारी येत असतात. कचरा संकलनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत क्यूआर कोडचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्यामुळे घंटागाडी नेमकी कोणत्या भागात गेली ? कुठे कचरा संकलन केले ? या सर्व बाबी समजणार आहेत आणि कचरा संकलन ही सुरळीत होण्यास मदत होणार आहे.नागरिकांनी तक्रारी केल्यास त्याचे तात्काळ निवारण करता येणार आहे. त्यासाठी अजून तीन महिन्याचा अवधी आहे असे घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे यांनी सांगितले आहे.