आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सत्कारप्रसंगी ते बोलत होते.आ. कर्डिले म्हणाले, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तनपुरे यांच्याकडून मंत्रिपदाच्या काळाखंडामध्ये जी मतदार संघाची विकास कामे व्हायला पाहिजे होती,ती विकासकामे कुठलीही झाली नाही.
हिंदूंच्या जोरावर मी राहूरी, नगर, पाथर्डी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी झालो असून या पुढील तालुक्यातील सर्व निवडणुका हिंदूंच्या जीवावर लढवल्या जातील, असे प्रतिपादन राहुरी, नगर, पाथर्डी, मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
महायुतीच्या सरकारमध्ये पालकमंत्रीपदी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली.त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावण्याचे काम केले.
त्यांनीही मी आमदार नसताना सर्व अधिकार मला देऊन जनतेची कामे सोडवण्यासाठी मोठी ताकद दिली.या ताकदीच्या जीवावर अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
२०२४ च्या निवडणुकीमध्ये राहूरी नगर पाथर्डी मतदार संघातील अनेक तरुण विविध संघटना यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून माझी निवडणूक हातात घेतली.खरंतर हिंदुत्वाच्या मुद्यावर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी या निवडणुकीमध्ये मोठी कसरत करून मोठ्या फरकाने मला विजयी केले.
राहुरी तालुक्यातील सर्वाधिक मते देऊन तालुक्याने जो माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही.वांबोरी जिल्हा परिषद गट मध्ये राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील यांनी वांबोरी गावामधून मोठा लीड देऊन विजयाचा मार्ग सुखकर केला.
अॅड. पाटील यांनी विविध कामे वांबोरी गावासाठी व तालुक्यासाठी मार्गी लावण्याचे प्रयत्न केले.त्याच पद्धतीने मुलींचे शिक्षण व्हावे म्हणून अकरावी-बारावी वांबोरी गावात सुरू करण्यात यावी,अशी त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माझ्याकडे मागणी करून ही मागणी पूर्ण करून घेतली.
त्यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाही व त्यांची इतर ठिकाणी शिक्षणाला जाण्याची अडचण दूर झाली आहे.आजपर्यंत सत्ता असो, अगर नसो, जनतेची सेवा करणे हीच माझी सत्ता होती.कुठल्याही अधिकाऱ्याला काम सांगताना मी माझी पकड आजही कायम ठेवली आहे.
कामे झाली तर समाजही आपल्याबरोबर राहतो.आपण सत्तेत जातो किंवा लोकप्रतिनिधी होतो, हे फक्त जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच याची मला जाण आहे, असे आ.कर्डिले यांनी सांगितले.
यावेळी डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, पंचायत समिती माजी सदस्य सुखदेवराव कुसमुडे, सरपंच किरण ससाणे, अॅड. तात्यासाहेब डोळसे, शामराव पटारे, भाऊसाहेब केंद्रे, रामभाऊ बोरकर, देविदास जवरे, काका पागिरे, शिवाजी मोरे, सारंगधर पटारे, दीपक गडाख, संजय नागदे, दत्तात्रय मोरे, बाळू मनोत, नवनीत मुथ्या, भाऊसाहेब ढोकणे, रामनिवास झंवर, मनोज बिहाणी, रवी पठारे, विलास गुंजाळ, सुदाम पाटील, राजेंद्र पाटील, जालू कांबळे, परेश व्यास, बंटी कुसमुडे, रामा धनवडे, दत्तात्रय गांधले, महादू डोके आदींसह तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.