महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोर उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासोबत काम करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले.त्यांना बंडखोर उमेदवारांप्रमाणे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी व पुन्हा त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये,असा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाला आणखी बळकटी आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानाला देखील आजपासून प्रारंभ करण्यात आला.
नेवासा फाटा येथे मंगळवार (दि.१०) रोजी नेवासा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकास्तरीय कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले.महायुतीची सत्ता आल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीमध्ये पारित करण्यात आला.
याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यकर्त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात येईल तसेच भविष्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.
याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवा नेते ऋषिकेश शेटे, अशोक टेकणे, मनोज पारखे, विधिज्ज्ञ विश्वास काळे, डॉ. लक्ष्मण खंडाळे, प्रताप चिंधे, सरपंच सतीश काळे, सरपंच पांडुरंग वाघ, सरपंच अंकुश धनक, राजेंद्र दराडे, संभाजी लोंढे, अंकुश काळे, अमृता नळकांडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस लक्ष्मण मोहिते, प्रमोद घावटे, निरंजन डहाळे, मनोज डहाळे, विलास बोरूडे, शिवाजी लष्करे, माऊली गंगावणे, नाना डौले, अब्दुल पठाण, आदिनाथ पटारे, आकाश कुसळकर, ऋषिकेश दारुंटे, पोपट शेकडे, निखिल जोशी, बाळासाहेब कोलते, सचिन देसरडा, राजेश कडू, दिनेश पिटेकर, संतोष कुटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.