महाविकास आघाडीच्या सरकारने जिल्हा परिषद गट व गणाची फेर रचना केली होती.पण महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर महायुती सरकारने केलेली फेर रचना रद्द ठरवत गट व गणाची रचना जैसे थे ठेवली.
जिल्हा परिषदेच्या निवडणूका न्यायालयिन प्रक्रिमेमुळे निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूका अगोदर घेतल्या.जानेवारी महिन्यात त्यावर अंतिम निर्णय सुनावण्यात येणार आहे.
आता विधानसभा निवडणुका पार पडल्या असल्यामुळे जवळपास सगळ्याच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधानसभा निवडणुकीत आपल्या नेत्यांसाठी पळापळ केली असल्याचे दिसून आले.
श्रीगोंदा तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गण आहेत.आढळगाव, काष्टी, येळपणे, बेलवंडी, कोळगाव, मांडवगण असे सहा गट आहेत.जवळपास दोन वर्षे लांबणीवर पडलेल्या निवडणुका आता कधीही लागू शकतात,असे राजकीय जाणकारांनी सांगितले आहे.
श्रीगोंदा पंचायत समितीची सत्ता कॉंगेस राष्ट्रवादीच्या ताब्यात होती, तर सहापैकी चार जिल्हा परिषद सदस्य भाजपचे, तर राष्ट्रवादी एक अन् काँगेस एक अशी सदस्यसंख्या होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर पडल्या आहेत.जानेवारी महिन्यात यावर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीला अजून काही महिन्यांचा वेळ बाकि असला तरी इच्छुकांनी आता पासूनच तयारीला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबद्दल काहीही निर्णय होवो,उमेदवार आपली निवडणुकीची तयारी जोरात करत असल्याचे पहायला मिळत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत श्रीगोंदा मतदार संघातून भाजपचे विक्रमसिंह पाचपुते विजयी झाले आहेत.राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात भाजपचे पारडे उजवे मानले जाते.त्यामुळे भाजपकडून प्रत्येक गटात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जास्त उमेदवार इच्छुक आहेत.
दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे कॉंगेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना पक्षात शांतता जाणवत असली तरी कॉंगेस, राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची संख्या सुद्धा कमी नसल्याचे दिसत आहे.