विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघांत शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्याकडून भाजपच्या राम शिंदे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे.राम शिंदे यांना ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीन बद्दल संशय असून त्यांनी सर्व मशिन्सची पडताळणी करण्यासाची मागणी केली आहे.त्यांनी स्वतःच माध्यमांना याबाबत सांगितले आहे.

निवडणूकिचा निकाल लागल्यानंतर सात दिवसांच्या आत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला ईव्हीएम मायक्रोकंट्रोलरची पडताळणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार असतो.

निवडणूक निकालानंतरही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीच्या प्रक्रियेवर संशय येत असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला फेरतपासणी करण्याची मागणीचा सुद्धा अधिकार असतो.त्या प्रक्रियेसाठी राम शिंदे यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अपील करावे लागणार आहे.

त्याच प्रकारे लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघातील श्रीगोंदा, पारनेर मतदारसंघांतील प्रत्येकी १० आणि नगर, शेवगाव, कर्जत-जामखेड, राहुरी येथील मतदान केंद्रांच्या प्रत्येकी ५ अशा प्रकारे सुजय विखे यांनी ४० ईव्हीएम मशिन्सची पडताळणी करण्यात यावी.

अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.त्यामुळे एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेलया आहेत.

ज्या विभागातील मतदानाबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे त्या विभागातील ईव्हीएम मशिन्सची ५ टक्के बर्न्ट मेमरी याद्वारे तपासली जाणार आहे.एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी करण्यासाठी चाळीस हजार रुपये इतका खर्च येत असतो.

त्याचसोबत त्यावर लागणारा १८ टक्के जीएसटी कर सुद्धा भरणे उमेदवाराला अनिवार्य असते.उमेदवारांना निकाल लागल्यापासून सात दिवसांत ईव्हीएम मायक्रोकंट्रोलर तपासणी बद्दल तक्रार करता येते.तपासणी दरम्यान इतर कोणी कोर्टात अपील केले नाही तर निवडणूक आयोग त्याबद्दल ४५ दिवसांनंतर निर्णय सुनावते.