Ahilyanagar News : संपूर्ण राज्यात लक्ष्यवेधी ठरलेल्या शिर्डी लोकसभेच्या निवडणूक निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. निकालास तीन आठवड्यांचा अवधी असला, तरी मतदानाची आकडेवारी व तज्ज्ञांची मते जाणून घेऊन निकालाचे अंदाज बांधले जात आहेत. निवडून कोण येणार, यावरून गावोगावी पैजा लागल्या आहेत. यात नागरिकांसह राजकीय कार्यकतें व पदाधिकारी यांचा समावेश आहे.
महायुतीचे खासदार सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात जोरदार लढत झाल्याचे वाटत असले, तरी वाचत बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांच्या एंट्रीने निवडणुकीत ट्विस्ट आणला. त्यामुळे यंदाची शिडर्डी लोकसभा निवडून राष्ट्रीय स्तरापर्यंत गाजली.
एकास एक लढतीचे चित्र बदलून ही निवडणूक तिरंगी होईपर्यंत अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या, राज्यातील दिग्गज नेत्यांनी सभा, पदयात्रांच्या माध्यमातून रान पेटविले. मतदानाची प्रक्रिया सोमवारी पार पडल्यानंतर रात्रीपासून निकालाचे अंदाज व्यक्त होऊ लागले.
मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची नाराजी, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच हवे, भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला सहानुभूती हे मुद्दे चर्चेला होते, मनापासून नसले तरी तांत्रिकदृष्ट्या काळे, कोल्हे, विखे, परजणे, औताडे, काका कोयटे हे सर्वच एका बाजुला असल्याने याचा आयता फायदा लोखंडेना होणार असे बोलले जात आहे. निष्ठावान शिवसैनिकांनी तुटपुंज्या साहित्यावर खिंड लढविण्याचा प्रयत्न केला, जनतेने निवडणूक हातात घेतली या नावाखाली दोन्ही उमेदवारांनी हात आखडता घेतला, अर्थात याची किंमत मतदानाचा टक्का घसरण्यात झाली.
शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असल्याने शिवसेनेच्या मतांची विभागणी होणार आहे. सुशिक्षित मतदारांनी मोदींना पसंती दिली, तर दुसरीकडे सहानुभूती म्हणून ठाकरे यांच्याकडे बघितले जात होते. यातील कोणता मुद्दा प्रभावी राहिला, त्यावर निकाल लागणार आहे, तसेच खासदार लोखंडे विजयाची हॅट्रिक करणार की भाऊसाहेब वाकचौरे पराभवाची ? हेही कळेल.
या वर्षी मतदानाचा टक्का कमी राहिला. लोकसभा मतदारसंघात १० लाख ५७ हजार २९८ मतदान झाले. मतदारसंघातील अकोले १ लाख ५५ हजार ९३० (५९. ८२%), संगमनेर १ लाख ८४ हजार ३१ (६५.७७ %), शिडी १ लाख ७८ हजार ७१६ (६३.७७%), कोपरगाव १ लाख ७१ हजार ५९ (६१.१८%), श्रीरामपूर १ लाख ९३ हजार ६०५ (६४.०८%), नेवासा १ लाख ७३ हजार ९५७ (६३.२९%) मतदान झाले. २०१९च्या निवडणुकीत १० लाख ३० हजार ५०२ (६४.९३%) मतदान झाले होते.
सन २०२४ च्या तुलनेत मतदानाचा टक्का ३.७५ टक्क्यांनी घसरला असला तरी मतदानामध्ये मात्र २० हजार मतांची वाढ दिसते. या निवडणुकीत शिवसेना भाजपचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना ४ लाख ८६ हजार ८२० (४७.२९%) मतदान झाले होते, तर काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना ३ लाख ६६ हजार ६२५ (३५.६२%) तर वचितचे संजय सुखदान यांना ६३ हजार २८७ (६.१५%) मतदान झाले होते. सव्वालाख मतांनी लोखंडे दुसऱ्यांदा विजय झाले होते.
अकोले, शिडी, कोपरगाव यापेक्षा श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा विधानसभा मतदारसंघात ४५ हजार जादा मतदान झाले आहे. श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा मतदारसंघात ५ लाख ५१ हजार ५९३ तर अकोले, शिर्डी व कोपरगाव या तीन मतदारसंघात एकूण ५ लाख ५ हजार ७०५ इतके मतदान झालेले आहे. तुलना करता श्रीरामपूर, संगमनेर व नेवासा या ठिकाणी ४५ हजार मतदान जादा झाले आहे.
आजपर्यंत झालेल्या निवडणुका या पक्षाच्या, विचारधारेच्या आधारे होत होत्या. नेत्यांबरोबर कार्यकत्यांचाही कस लागत होता; मात्र यावेळी महायुती व महाआघाडी यामध्ये सर्व मोठमोठाले विळ्या भोपळ्याचे सख्य असलेले पक्ष एकत्र आले. त्यात विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले गेले.
ही निवडणूक महायुती विरोधात महाआघाडी अशी असली तरी वा निवडणुकीत विकासाच्या मुद्दयांपेक्षा इतर विषयांवरच चर्चा झाली. मतदारांचा मूड थेट मोदी किंवा घेट ठाकरे असाच राहिला.
लोखंडे दोनदा खासदार झाले, आता ते महायुतीत आहेत तर वाकचौरे एकदा महायुतीतून निवडून आले होते, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले, यावेळी त्यांचा पराभव झाला, आता ते महाआघाडीत आहेत. शिवसेनेचे धनुष्यबाण लोकांच्या डोक्यात आहे,
त्यामुळे मशाल चिन्ह किती लोकांपर्यंत पोहोचले, हाही संशोधनाचा भाग आहे. दोन पाच टक्के मते इकडे तिकडे झाली, तर याचा परिणाम निकालावर होऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांचाही निकालावर प्रभाव दिसेल,
हे सत्य नाकारता येणार नाही. लोखंडे व वाकचौरे या दोन्ही उमेदवारांबद्दल असलेल्या नाराजीमुळे मतदारांनी जर काही वेगळा विचार केला असेल, आणि तसा जर काही चमत्कार घडलाच तर रूपवते यांना संधी मिळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मतपेटीत बंद झाली आहेत. एक मात्र खरे की शिडी लोकसभा मतदारसंघाचा ४ जुनचा निकाल विधानसभेची समीकरणे बदलणारा ठरणार असेल यात तिळमात्र शंका नाही.
मतदारसंघातील दिग्गज
विधानसभा मतदार संघनिहाय विचार करता शिर्डी मतदारसंघात महायुतीचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार खेहलता कोल्हे,
माजी आमदार वैभव पिचड, गोदावरी दूध संघाचे राजेश परजणे, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे, महाआघाडीचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, आमदार लहू कानडे असे दिग्गज होते.