Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जूनला होणार आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी मतमोजणी केंद्रावर ९६ टेबल असणार आहेत. यासाठी प्रशासनाने ७६८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमला पोलिस संरक्षण आहे. ४ जूनला दुपारी बारा वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघातील निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

नागपूर औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या दोन्ही गोदामात मतमोजणीची प्रशासनाने तयारी केली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय ही मतमोजणी होणार आहे.

प्रत्येक टेबलवर ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल व पोस्टल मोजणीसाठी २ टेबल राहतील. दरम्यान, मतमोजणीपूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.