अहिल्यानगर लोकसभा मतदार संघातील १८६९ बुथमधे सीसीटीव्ही कॅमेऱ्याव्दारे मतदान प्रक्रियेवर निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.
मतदान बुथमधे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम प्रगती पथावर आहे. दोन दिवसात हे काम पुर्णत्वाकडे जाणार आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना जिल्ह्यातील १८६९ बुथमधे चाललेली मतदानाच्या प्रक्रियेवर थेट लक्ष ठेवता येणार आहे.
त्यामुळे मतदानामधे काही गैरप्रकार रोखले जाणार आहेत. अहिल्यानगर मतदार संघात १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदानामधे काही गैरप्रकार घडू नये, यासाठी निवडणुक यंत्रणा कमालीची काळजी घेत आहे. मतदान बुथमधे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तेथील परस्थीतवर थेट लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पाथर्डीमधे ८१ बुथवर, शेवगावमधे १०१ बुथवर, कर्जत-जामखेडमधे-१७८ बुथमधे, श्रीगोंदा १७२ अहिल्यानगर शहर व परिसर १४६ तर राहुरीमधे १५८ बुथवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरु आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रशासन काम करीत आहेत.
प्रांतअधिकारी प्रसाद मते, तहसिलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी काबंळे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी देखील मतदान जागृती अभियान राबविले आहे. मतदान केंद्रावर जाऊन बुथची तपासणी केलेली आहे. संवेदनशील बुथवर जास्तीचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्याच्या सुचना केल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने कोमताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
मतदानाच्या दिवशी विज कंपनीच्या अधिका-यांना सुचना करुन विजप्रवाह खंडीत होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिलेल्या आहेत. तालुका पातळीवर देखील विजवितरण कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना विजपुरवठा सुरळीत रहावा, असे सांगितलेले आहे.
मतदान केंद्रवार काही अडचणी आल्यास तातडीने कडक कारवाईसाठी पोलिसांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. मतदान केंद्रवार व परीसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी प्रशासन व निवडणुक आयोगाची यंत्रणा काम करीत आहे.