कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर पहायला मिळाली.संध्याकाळी उशिरापर्यंत चार-पाचशेः कधी सात आठशे मतांच्या फरकाने दोन्ही उमेदवारांचा ‘आघाडीवर पिछाडीवर’ असा खेळ सुरू होता.

त्यात राम शिंदे यांचा अवध्या १२४३ मतांनी पराभव झाला.शिंदेंच्या मनात पराभवाची सल ताजी असतानाच काका पुतण्याची दर्शन भेट व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाली आहे.त्यामुळे शिंदेच्या मनात सल अजून ताजी झाली.

शिंदे यांनी मुंबई येथे पक्ष कार्यालयामध्ये पत्रकार परिषद पेऊन त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांनी कट रचून माझा पराभव केला,असा थेट आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला.

हे बोलत असताना अत्यंत भावनिक झालेलेल्या शिंदे यांना आपल्या भावना अनावर झाल्यामुळे यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.पुढे बोलताना ते म्हणाले, “”माझ्या विरोधात कट रचला आणि त्याचा मी बळी झालो.

पवार यांच्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात मी लढा दिला.माझा अतिशय कमी फरकाने पराभव झाला.राज्यामध्ये जे आमदार पराभूत झाले,त्यात शिंदेंचा चौथा क्रमांक आहे.त्यांना एक लाख २६ हजरांपेक्षा जास्त मते मिळाली.

असे असूनही महायुतीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी स्वतःच रोहित पचार यांच्या सोबत बोलताना ‘मी तुझ्या मतदार संघांमध्ये सहभाग घेतला असता तर तुझा पराभव झाला असता’ असे भाष्य केले आहे.

त्यांनी असे करायला नको होते.अजित पवार माझ्या सभेला न आल्यामुळेच माझा पराभव झाला…” असा आरोप आ. शिंदे यांनी केला.याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.