Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : नगर दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला.

याप्रकरणी निलेश लंके प्रतिष्ठान, पाथर्डी या व्हॉट्स अॅप ग्रुपमधील लोकनेते सोशल मीडिया नावाने असलेल्या एका मोबाईलधारक अनोळखी व्यक्तीविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. विखे पाटील यांचे प्रचारक निखील बाबासाहेब वारे (वय ३९ रा. शीलाविहार, सावेडी) यांनी तक्रार दिली. नीलेश लंके प्रतिष्ठान,

पाथर्डी या व्हॉट्स अॅप ग्रुपवर ‘लोकनेते सोशल मीडिया’ नावाने असलेल्या मोबाईलधारक अनोळखी व्यक्तीने डॉ. विखे पाटील यांची बदनामी करणारी पोस्ट टाकली.

त्यामुळे तक्रारदार, कार्यकर्ते व सर्वसामान्य मतदारामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.