Ahilyanagar News : नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची संधी मिळणार नाही हीच एकमेव गॅरंटी आहे, असा टोला तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी लगावला आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप जास्तीत जास्त २०० जागांपर्यंत मजल मारू शकते. पण, विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी ३०० हून अधिक जागा जिंकत केंद्रात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा त्यांनी केला.
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कल्याणी येथे निवडणूक सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, संदेशखाली प्रकरणावरून भाजपने खोटा प्रचार करून राज्यातील महिलांची प्रतिमा मलीन केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘गॅरंटी बाबू’ संदेशखाली प्रकरणावरून बंगालला विनाकारण बदनाम करीत आहेत. पण, आता सत्य हळूहळू समोर येत आहे.
भाजपच्या स्थानिक नेत्यांनी संदेशखालीतील अनेक महिलांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर, त्याच कागदावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. यासंबंधी सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्यात भाजपचा पर्दाफाश झाल्याची टीका ममतांनी केली. बंगालमध्ये ‘नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम’ (सीएए) व ‘ राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ (एनआरसी ) लागू होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार ममतांनी केला.
लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी सत्तेत येणार नाहीत, हीच खरी गॅरंटी आहे. यंदा ‘इंडिया’ आघाडी २९५ ते ३१८ जागांसह सत्ता पादाक्रांत करणार आहे. तर, भाजप जास्तीत २०० जागा जिंकण्यापर्यंत मजल मारू शकते, असा दावा ममतांनी केला भाजपचे नेते प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करीत आहेत. धर्म प्रथा व खाण्याच्या सवर्य यांसह आपण काय खावे आणि काय करू नये, हेसुद्ध त्यांनाच ठरवायचे आहे. पण हे आम्ही खपवून घेणार नाही असे ममतांनी ठणकावले.
मोदी त्यांच्या भाषणात नागरिकांनी मांस, मासे व अंडी खाऊ नयेत असा सल्ला देतात. पण, मी बालपणापासून स्वयंपाक बनवते अनेकांनी माझ्या पाक कौशल्याचे कौतुक केले. आता मी मोदींसाठ स्वयंपाक बनवण्यास तयार आहे त्यांच्या आवडीचे पदार्थ मी बनवेन पण, , ते मी बनवलेले पदार्थ खातील की नाही ठाऊक नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.