Ahilyanagar News : अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली असून, खासदार कोण होणार ? विखे की लंके, यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आता प्रतिक्षा दि. ४ जूनची आहे, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
पारनेर तालुक्यात या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.गेल्या ४५ दिवसांत विखे परिवार व लंके परिवार यांनी लोकसभा मतदारसंघ अक्षरशः ढवळून काढला असून, आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी ठरली.
लोकसभा निवडणुकीतील उमेदवार हे तालुक्याच्या ठिकाणी किंवा फार फार तालुक्यातील “एखाद दोन मोठ्या गावांमध्ये एखादी सभा घेत असत. यंदा मात्र पारनेरचे माजी आमदार निलेश ल॑के यांच्या उमेदवारीमुळे प्रथमच प्रचंड चुरस निर्माण झाली.
तसे ‘पाहता खा. सुजय विखे यांना एकतर्फी व एक हाती असणारी ही निवडणूक ल॑के यांच्या उमेदवारीने अधिक चुरशीची झाली. आपापल्या नेत्याला जास्तीत जास्त मतदान व्हावे, म्हणून पारनेर तालुक्यात कार्यकर्त्यांनी वाद घालत अक्षरश : अंगावर घावुन जाण्याचे तुरळक प्रकारही घडले.
सुजय विखे यांना ही निवडणूक जिंकून पुन्हा एकदा खासदार होणे, हे त्यांच्या, विखे घराण्याच्या व भाजपाच्या हष्टीने आवश्यक आहे. शिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे गांना आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्री पदाची असणारी संत्री व त्या दृष्टीने त्यांची यंत्रणा ही या आधीपासून कार्यरत झालेली आहे.
त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, या भाजपाच्या हुकमी नेत्यांशी असलेले घनिष्ट संबंध, तर विखे घराण्याची असलेली राज्यातील ओळख व ताकद पाहता खा, विखे कसल्याही परिस्थितीत विजयी होतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. त्यांची यंत्रणा ही दिवंगत केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे यांच्या निवडणुकीपासून ‘प्रवरेची यंत्रणा’ म्हणून प्रसिद्ध आहे.
अशी यंत्रणा जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. त्यामुळे यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, भल्या भल्यांना याची धडकी भरते. निवडणुकीसाठी सर्व नियोजन फक्त विखे घराण्याच्या निकट असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात असते. भलेही विखे कोणत्याही राजकीय पक्षात असी, त्यांच्या निवडणुकीचे सर्व नियोजन हे नेत्यांकडे नसते, तर प्रवरेच्या यंत्रणेकडेच असते. विखेंचे जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीकडे लक्ष असते व तसे आदेशही प्रवरेकडून नेत्यांना पोहच केले जाते.
माजी आमदार निलेश लंके हे सामान्य कार्यकर्ते व सेवानिवृत्त शिक्षकाचा मुलगा म्हणून पारनेर तालुका, नगर जिल्ह्या बरोबर राज्यात प्रसिद्ध, लंके हे राज्यातील प्रसिद्ध पवार घराण्याबरोबर एकनिष्ठ माणून परिचित. ज्यावेळी राज्यात पवार घराण्यात फूट पडली, त्यावेळी लंके यांना मोठा यहण प्रश्न पडला, शरद पवार, की अजित पवार ? पण सत्तेबरोबर राहिल्यास मोठ्या प्रमाणावर विकासकामे करता येतील व सत्ताही ताब्यात राहील, या विचाराने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गांना साथ दिली.
पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली व राज्यातही मोठ्या प्रमाणावर निलेश लंके या नावाची हवा केली. राजकारण करताना त्यांनी लहान मुले, महिला, वृद्धांकडे खास करून लक्ष दिल्याने त्यांची एक ब्रोझ निर्माण झाली.
लोकसभा निवडणूक लढविण्याचे त्यांचे मनसुबे कधी ही लपून राहिले नाही. त्यांनी त्या दृष्टीने आधीपासूनच तयारी केली होतीच, त्यात त्यांचे व विखे पिता पुत्रांशी असलेले राजकीय वैर. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले नाते एका क्षणात तोडून टाकले व शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केले.
त्या दृष्टीने पूर्ण तयारी करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यांच्या या निर्णयाने लोकसभा निवडणुकीत प्रचंड उलथापालथ पाहावयास मिळाली. ही निवडणूक अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी झालेली पाहावयास मिळत आहे. विखे व ल॑के यांचे कार्यकर्ते अगदी जीव तोडून मेहनत घेताना दिसून येत होते, त्यांनी घर ना घर पिंजून काढले.
या निवडणुकीत जर विखे पराभूत झाले, तर त्यांचे राजकीय घराणे मोठे असल्याने व त्यांच्याकडे सत्ता स्थाने असल्याने ते पुढे राजकारणात कार्यरत राहतील, पण पराभवाने थोडया मर्यादाही येतील. तर ल॑के पराभूत झाले तर राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, त्यांच्याकडे कोणतीही सत्ता नाही.
पण नेते म्हणून राज्यात असलेली प्रसिध्दी कामाला येईल व पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागतील. जो जिंकेल, तो किंग व जिल्ह्याचा किंगमेकर असेल आणि जो नेता लोकसभेला पराभूत होईल, त्याला पुन्हा अस्तित्वाची लढाई करावी लागेल.
शेवटी पराभूत नेत्या भोवतीचे कार्यकर्त्यांचे वलय, कोंढाळा कमी होतो. त्यांच्याही अस्तित्वाची ही खरी लढाई आहे. तर विजयी नेत्याकडे कार्यकर्त्यांची गर्दी उसळते. मुळातच उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रवृत्ती जास्त असते. मतदान संपल्यामुळे कार्यकतेंही निवांत व निर्धास्त झाले आहेत, मात्र, उमेदवार दि. ४ जूनपर्यंत गॅसवर आहेत, तेही वर वर जरी निवांत दिसत असले तरी त्यांनाही निकालापर्यंत झोपा नाही.
आज कोणीही छाती ठोकपणे विजयाचा दावा करू शकत नाही. सोमवार, (दि. १३) रोजी विखे व लंके यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले आहे. यावर पारनेर तालुक्यात अनेकांनी मोठ मोठ्या पैजाही लावल्याच्या समजते आहे. तर काहींनी देवही निकालापर्यंत पाण्यात ठेवले आहेत. ४ जूनला कळेलच, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा खासदार कोण ? सुजय विखे की निलेश ल॑के ?